Home Uncategorized नव्या मोटार वाहतूक कायद्याविरोधात वाहतुक संघटनांनी दिल्लीत पुकारला बंद

नव्या मोटार वाहतूक कायद्याविरोधात वाहतुक संघटनांनी दिल्लीत पुकारला बंद

0

१ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढली असून बऱ्याच वाहनचालकांना ट्राफिक पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे. त्याविरोधात आवाज उठवून दिल्ली व आजूबाजूच्या राज्यांतील जवळपास ५० वाहतूक संघटनांनी आज चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दिल्ली, गाझियाबाद, नॉयडा, गुरुग्राम इत्यादी शहरांमधील शाळांना सुट्टी जाहीर केली गेली आहे.

केंद्र शासनाने लागू केलेल्या नव्या मोटार वाहतूक कायद्यामध्ये ‘नियमांची सक्ती नसून दंडाची सक्ती केली जात आहे’ असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दंडाची रक्कम देखील साधी नसून लाखापर्यंत गेली तसेच विम्याच्या रकमेतही मोठी वाढ केली असल्यामुळे वाहनचालक संघटनांशी याबाबत पूर्वचर्चा करायला हवी होती तसेच अगोदर सुविधा द्याव्या आणि मग कायदे लागू करावे अशा मागण्या संघटनांनी केल्या असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बुधवारी रात्रीपासून चालू केलेला हा बंद पुढील २४ तास चालणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वाहतूक खोळंबली असून लोकांना येण्याजाण्यास त्रास होत आहे.