
कझाकिस्तानमध्ये ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स अशा १०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाणार होतं. टेक ऑफ दरम्यान विमानाचा ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती मिळत आहे.
या विमानात क्रु मेंबर्ससह एकूम १०० प्रवासी प्रवास करत होते. आपत्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून सध्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.