Home जागतिक अमेरिकेत एकाच दिवसात २६०० मृत्यू; तरी ट्रम्प बोलतात लॉकडाउन उठवणार

अमेरिकेत एकाच दिवसात २६०० मृत्यू; तरी ट्रम्प बोलतात लॉकडाउन उठवणार

0

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा युरोप नंतर आता अमेरिकाला बसू लागला आहे. चीननंतर इटली, स्पेन आणि इराणला कोरोनाने प्रचंड ग्रासलेले होते. मात्र, आता अमेरिकेमध्ये दिवसाला २६०० कोरोनाचे बळी जात असल्याने जागतिक महासत्ता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. असे असुनही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेथील लॉकडाऊन उठविण्याच्या विचारात आहेत.
अमेरिकेमध्ये गेल्या आठवडाभरापासून मृतांचा आकडा रोज २००० पार करत होता. बुधवारीच केवळ १५०० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज पुन्हा एकाच दिवशी २६०० लोकांचा बळी गेल्याने अमेरिकेने रेकॉर्ड केले आहे.

यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेने कोरोनाच्या बाबतीत आता शिखर गाठले असल्याची टिपण्णी केली आहे. आज ट्रम्प जी-७ संघटनेच्या देशांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार असून यामध्ये ते आणि सदस्य देश कोरोनावरून आंतरराष्ट्रीय समन्वयावर चर्चा करणार आहेत. G7 या समुहामध्ये ब्रिटेन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान सहभागी आहेत.

अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. गेल्या शुक्रवारी २०६९ लोकांचा मृत्यू झालेला होता. रविवारी आणि सोमवारी १५०० जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेला लॉकडाऊन ठेवल्याने दिवसाला २५ दशलक्ष डॉलरचे नुकसान झेलावे लागत आहे. एकट्या न्यू यॉर्क शहरामध्ये १० हजार जणांचा मृत्यू झाला असून आता या राज्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर लुसीयाना आणि कॅलिफोर्निया ही राज्ये कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत.
तर जगभरात १,२६,८७१ जणांचा मृत्यू झाला असून २० लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे.