Home जागतिक तब्बल १०० वर्षानंतर आफ्रिकेत “बगिरा”च दर्शन.

तब्बल १०० वर्षानंतर आफ्रिकेत “बगिरा”च दर्शन.

0

प्राईम नेटवर्क : आपल्या लहानपणीचं आवडत नाटक कोणत असा प्रश्न विचारल्यावर “द जंगल बूक” हे अनेकांच उत्तर असेल, हो ना? यातील मोगली चा बेस्ट फ्रेंड बगीरा तुम्हाला आठवतोय का? तसाच एक बगिरा (ब्लॅक पँथर) आफ्रिकेच्या जंगलामध्ये दिसून आला आहे. या दुर्मिळ ब्लॅक पँथरचा फोटो ब्रिटनचा ३५ वर्षीय फोटोग्राफर विल बुरार्ड लुकस याने घेतला आहे. आफ्रिकेत १०० वर्षात पहिल्यांदाच ब्लॅक पँथरला कुणी कॅमेरात कैद केल्याचा दावा विलने केला आहे. अतिशय कमी संख्येने असलेल्या ब्लॅक पँथरचे दर्शन याआधी १९०९मध्ये झाले होते. त्यानंतर तब्बल १०० वर्षानंतर आफ्रिकेत ब्लॅक पँथर दिसून आला आहे.

विल सध्या बायोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये ब्लॅक पँथर पाहिल्याची चर्चा होती. चर्चा ऐकल्यानंतर विलने एका सुरक्षित जागेवर हाय क्वालिटी डीएसएलआर कॅमेरा सेट केला होता. विलने कॅमेऱ्यासोबत वायरलेस मोशन सेंसर आणि तीन फ्लॅश लाइट्सचा या उपकरणाचा वापरही केला होता. विलने फोटो काढलेला मादी ब्लॅक पँथर आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विल म्हणाला की,अंधुकसा प्रकाश त्याचबरोबर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्यावेळी ब्लॅक पँथरचे फोटो घेतले आहेत.

जगभरामध्ये ब्लॅक पँथरची संख्या कमी आहे. ब्लॅक पँथर ही स्वतंत्र जात नसली, तरी गुणसूत्रातील बदल आणि कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे तो संपूर्ण काळा असतो. त्यामुळे दिसतानाही तो अतिशय आकर्षक दिसतो. असे प्राणी अभ्यासक सांगतात. ब्लॅक पँथर आढळल्याने प्राणी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.