Home जागतिक चहा बनविणारा सुद्धा बनू शकतो पंतप्रधान, ही फक्त भारतीय लोकशाहीची कमाल :...

चहा बनविणारा सुद्धा बनू शकतो पंतप्रधान, ही फक्त भारतीय लोकशाहीची कमाल : डोनाल्ड ट्रम्प

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी अहमदाबादमधील मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट ग्राउंडचे उदघाटन केले त्यावेळी ते बोलत होते. अहमदाबाद येथे ट्रम्प दाम्पत्याचे आगमन अगदी जल्लोषात झाले. विमानतळावर मोदींनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेतली. त्यानंतर तिन्ही सैन्यदलांनी त्यांना मानवंदना दिली व देशातील विविध नृत्यप्रकारांनी त्यांचे स्वागत केले गेले. 


“आज ज्या प्रकारे आमचे स्वागत केले गेले ते सर्व अविस्मरणीय आहे, त्यामुळे भारताविषयी आमच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. भारताचे पंतप्रधान यांनी एक किरकोळ चहावाला म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आज ते जगात बहुचर्चित व कौतुकास्पद पंतप्रधान म्हणून ज्ञात आहेत. इथपर्यंत पोहचणे खूप कठीण आहे. हा खरंतर भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे” असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. हे उद्गार ऐकताच मोदींनी जागेवर उठून ट्रम्प यांची हातमिळवणी केली. “काही दिवसांपूर्वी मोदी हुस्टनला गेले होते तेव्हा फुटबॉल ग्राउंड मध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम घेण्यात आला होता. आज मला भारतात नमस्ते ट्रम्प करण्याचे भाग्य लाभले” असेही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट देत गांधीजींच्या आठवणी समजून घेत चरख्यावर सूतकताई सुद्धा केली.


पहा ट्रम्प यांचे संपूर्ण भाषण: