आपण ऐकतच आहोत की कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या या व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल ३०० हुन अधिक लोकांनी आपले प्राण गमावले असून ही संख्या वाढत चालली आहे असे मीडिया न्यूज वरून समजते. त्यामुळे चीनमध्ये तसेच इतरही अनेक देशांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.
वाढत्या रुग्णांची संख्या पाहता संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि या रुग्णांच्या तातडीच्या उपचारासाठी चीन सरकारने केवळ आठ दिवसांत एक हजार बेड्स असलेलं हॉस्पिटल उभं केलं आहे असे लोकमतच्या एका रिपोर्टनुसार समजले. तसेच लवकरच या हॉस्पिटलमधून कोरोना व्हायरसच्या रुग्णांना उपचार मिळायला सुरुवात होईल. २३ जानेवारी पासून सुरू झालेले या हॉस्पिटलचे २५,००० चौरस मिटरचे बांधकाम केवळ ८ दिवसांतच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. या हॉस्पिटलमध्ये चीनच्या आर्मी डॉक्टर्सची तसेच मेडिकल कॉलेजेसमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इतक्या कमी कालावधीत इतकी व्यवस्था केल्याबद्दल चीनचे जगभरात कौतुक होत आहे.