
चीनचा मांस बाजार नव्हे तर चिनी प्रयोगशाळा, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास जबाबदार आहे का ? असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. चिनी लॅब जी अमेरिकेच्या पैशाने वटवाघुळांवर संशोधन करीत होती. हा खळबळजनक दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, चीनमधील ही लॅब अमेरिकन सरकारच्या अनुदानावर चिनी लेण्यांमधून काढल्या जाणार्या वटवाघुळांवर संशोधन करीत होती.
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे हे संशोधन केले जात होते. अमेरिकन सरकारने त्यांना या संशोधनासाठी सुमारे 10 कोटींचे अनुदान दिले. यापूर्वी चीनच्या या प्रयोगशाळेवर असे आरोप आहेत की त्यांनी हा विषाणू पसरविला आहे. ही प्रयोगशाळा वुहानच्या मीट मार्केट जवळ आहे. संशोधनासाठी त्याने 1000 मैलांच्या अंतरावर लेण्यांमधून वटवाघुळं पकडली.
वेबसाइटनुसार, त्यांना अशी काही प्रयोगशाळेची कागदपत्रे मिळाली ज्यातून असे दिसून आले आहे की अमेरिकन नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या निधीवर वैज्ञानिक वटवाघुळं वापरत होते. यापूर्वी असा अहवाल मिळाला आहे की काही प्रयोगांमुळे हा विषाणू जगात पसरला आहे. आता या बातमीला आणि या वृत्ताला दुजोरा मिळतोय.
या बातमीनंतर अमेरिकेत निषेधाचे आवाजही ऐकू येत आहेत. अमेरिकेचे खासदार मॅट गॅटझ म्हणाले की, ‘अनेक वर्षे अमेरिकन सरकार वुहान इन्स्टिट्यूटला जनावरांवर अशा धोकादायक व क्रूर प्रयोगांसाठी पैसे देत आहे हे ऐकून मी निराश झालो आहे. कदाचित यामुळेच, जगात कोराणा विषाणूचा प्रसार झाला आहे.