Home आरोग्य कोरोनाचा ब्रिटनमध्ये हाहाकार; प्रधानमंत्री तसेच इंग्लंडच्या राजपुत्रांना सुद्धा लागण

कोरोनाचा ब्रिटनमध्ये हाहाकार; प्रधानमंत्री तसेच इंग्लंडच्या राजपुत्रांना सुद्धा लागण

0


ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर वर दिली, ” मला काही दिवसांपासून सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत नुकत्याच केलेल्या चाचणी मध्ये मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले, मी स्वतःला सर्वांपासून विलग करीत असून माझी पंतप्रधानपदाची धुरा मी या पुढे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सांभाळण्याचे प्रयत्न करेन” असे ते म्हणाले.

बोरिस जॉन्सन सध्या कुठे राहतील याबद्दल नक्की माहिती मिळणे अवघड आहे कारण चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या पत्नी ह्या गरोदर असून त्यांची काळजी घेणे महत्वाचे राहील असे कळते. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी यांना सुद्धा कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

ब्रिटन मध्ये ११६०० कोरोना रुग्ण असून त्यातील ५७८ लोक मरण पावले आहेत. प्रधानमंत्र्यांनी पूर्ण ब्रिटन मध्ये पुढील ६ महिने पूर्णपणे लॉकडाउन करण्याची घोषणा केली असून त्यांनी नागरिकांना घरात राहण्याचे व संपर्क टाळण्याचे आवाहन केले आहे.