Home जागतिक भारत चीनमध्ये पुन्हा तनाव; भारतीय सैनिकांची मोठी तयारी..

भारत चीनमध्ये पुन्हा तनाव; भारतीय सैनिकांची मोठी तयारी..

0

भारत – चीन तणाव फारसा कमी झालेला नसून त्यातच लडाख जवळच्या चीन सीमेवर असलेला तणाव वाढत चालला आहे. लष्करी पातळीवर चर्चा होऊनही चिनी सैनिक मागे हटण्यास तयार नाहीये हे लक्षात येताच भारतानेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला असून त्या दिशेने योग्य ती तयारीही चालू केलीये.

या भागातील हवामान दुर्गम आणि प्रतिकूल असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे .त्यामुळे भारताने तिथे असलेल्या सैनिकांसाठी गरम कपडे,इंधन, तंबू,अन्न-धान्य अशा वस्तूंचा पुरवठा करणे चालू केले आहे. जोपर्यंत चीन मागे हटत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर ही मागे हटणार नाही असा इशारा लष्कर कमांडर जोशी यांनी दिला आहे.

तसेच अमेरिकेने चीनला मोठा धक्का दिला आहे. ७२ तासांमधे ह्यूस्टनमधला वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश चीनला देण्यात आले आहे. तसेच या तनावाताच भारताकडे एक नवीन अस्त्र आलं आहे. हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा बनणार असून युद्धपातळीवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालिंवर याच बारीक लक्ष असणार आहे.