Home जागतिक भयानक आगीनंतर आता ऑस्ट्रेलियात वादळाचे संकट! फोटो होत आहेत व्हायरल

भयानक आगीनंतर आता ऑस्ट्रेलियात वादळाचे संकट! फोटो होत आहेत व्हायरल

0

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली होती ज्यात सुमारे ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले तर १८ लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर आगीत २०० घरे उध्वस्त झाली तर १ कोटी ८९ लाख एकर जंगल जळून खाक झाले. या वनव्यातून ऑस्ट्रेलियातील जनजीवन सावरलेही नाही की आता परत वाळू वादळाचे मोठे संकट ऑस्ट्रेलियावर ओढवले आहे. सामनाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ही माहिती मिळत आहे.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार, आपण वरती जी भयावह वादळाची चित्रे पाहत आहोत ती ऑस्ट्रेलियाची आहेत. या वाळू वादळाचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे फोटोज Jason Davies याने टिपल्याचे सांगितले जात आहे.