Home जागतिक भारताचा मोठा विजय, पुलवामाचा मास्टर माईंड मसूद अझर वर सुरक्षा परिषदेत बंदीचा...

भारताचा मोठा विजय, पुलवामाचा मास्टर माईंड मसूद अझर वर सुरक्षा परिषदेत बंदीचा प्रस्ताव मंजूर

0

प्राईम नेटवर्क : सध्या भारताचा मोठा राजनैतिक विजय झाल्याचं बोललं जातंय, कारण, संयुक्त राष्ट्र संघाने पुलवामा साठी जवाबदारी घेणारा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी घालत असतानाच त्याचा प्रमुख मसूद अझर याला सुद्धा काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात मसूद अझरवर कुठल्याही प्रकारची प्रवास बंदी, संपत्ती जप्ती, शस्त्र बंदी इ. कारवाई करण्यात यावी असं यात म्हटलं आहे.

आता चीन सुद्धा या प्रस्तावाला विरोध करण्याच्या मूड मध्ये नाही

मसूद अझरवर बंदी साठी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांनी कम्बर कसली असून, आता चीन सुद्धा या प्रस्तावाला विरोध करण्याच्या मूड मध्ये नाही, रशियाने या अगोदरच भारताला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रस्तावर फ्रान्स काम करत असून, येत्या पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं पद फ्रांस ग्रहण करणार आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदे मध्ये १५ देश कायम सदस्य आहेत. प्रत्येक महिन्याला एका देशाला अध्यक्ष पद दिलं जातं. यावेळी फ्रान्सला हे अध्यक्षपद मिळणार असून फ्रांस या प्रस्तावावर काम करणार आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेवर विस्फोटकांनी भरलेलं वाहन धडकवलं होतं

१९९९ मध्ये काठमांडू ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमानाचं अपहरण झाल्यां नतर प्रवाशांच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं होतं, त्यातील मसूद अझर हा एक होता, सुटका झाल्या नंतर एक वर्षातच जम्मू काश्मीर विधानसभेवर विस्फोटकांनी भरलेलं वाहन धडकवलं होतं, जम्मू काश्मीर मध्ये अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मसूद अझरचा थेट संबंध आढळला आहे.