Home जागतिक ‘क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून पाडलं’ इराणी लष्कराची कबुली!

‘क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून पाडलं’ इराणी लष्कराची कबुली!

0

इराणची राजधानी तेहरान येथे दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी युक्रेनचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यात सुमारे १८० प्रवाशांचा मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना विमानात झालेल्या तांत्रिक बिघडणे झाली अशी माहिती दिली जात होती मात्र आता या प्रकरणाने निराळेच वळण घेतले आहे.एक धक्कादायक माहिती समोर येत असून त्यानुसार अपघातग्रस्त विमान तांत्रिक बिघडणे नाही तर इराणच्या लष्करानं चुकून पाडलं असल्याची कबुली दिली आहे.

अपघात झाला त्या दिवशी एकीकडे इराणकडून अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तासानंतरच विमान दुर्घटना झाली. यावरून अनेकांनी विमानात तांत्रिक बिघाड नसून हि विमान मानवी चुक आहे अशी शंका व्यक्त केली होती. त्याच दिवशी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हे विमान चुकून पाडलं,अशी आता इराणी लष्करानं कबुली दिली आहे. लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार इराणच्या सरकारी माध्यमानं या घाटाने विषयी सविस्तर वृत्त दिलं असून युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती दिली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी सांगितलं. हि घटना चुकेने झाली असल्याचे सांगितले जात असून यावर पुढे काय कारवाई होईल ते वेळच सांगेल.