Home आरोग्य कोरोनापासून वाचण्यासाठी इटलीमध्येही हस्तांदोलन करण्यास बंदी!

कोरोनापासून वाचण्यासाठी इटलीमध्येही हस्तांदोलन करण्यास बंदी!

0

कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाला आळा घालणे सर्व राष्ट्रांना मुश्किल जात आहे. हा आजार पसरण्याची अनेक माध्यमं आहेत. अशातच इटलीमध्ये तेथील सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यातच इटलमध्ये लोकांना गळाभेट आणि हस्तांदोलनालाही बंदी करण्यात आली आहे.
कोरोना प्रभावी देशांमध्ये इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आतापर्यंत या देशात व्हायरसमुळे ७९ लोक मृत्यमुखी पडली आहेत. तर २५०० हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. इटली सरकारनुसार, ‘व्हायरसचे संक्रमण बघता सरकारने सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे.’ एवढंच नव्हे तर इटलीमधील सर्व फुटबॉल सामने रद्द केले आहेत.

भारतात आतापर्यंत २९ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने आतापर्यंत ३२८५ लोकांचा मृत्यू झाला असून ९५,४८१ लोकांना याची लागण झाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा दिल्लीत शिरकाव झाल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.