Home खेळ स्पर्धा विराट आणि विल्यम्सनचा हा फोटो का होत आहे इतका व्हायरल?

विराट आणि विल्यम्सनचा हा फोटो का होत आहे इतका व्हायरल?

0

वरील फोटो तुम्हाला सध्या बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दिसत असेल. त्यावरील मिम्स तसेच काही कमेंट्सही तुम्ही ऐकल्या असतील. या फोटोत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन सोबत बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत भारतीय संघातील गोलंदाज ऋषभ पंत देखील बसलेला दिसत आहेत. न्यूज १८ लोकमतच्या एका रिपोर्टनुसार भारताने मालिका जिंकल्यामुळे पुढील सामन्यांत वेगळे प्रयोग करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतली होती तर दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन संघातून बाहेर बसला होता.

बीसीसीआयने हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट करून स्पिरिट ऑफ क्रिकेट असे कॅप्शन दिले. बीसीसीआयचे ट्विट पुढीलप्रमाणे…

त्यावर चाहत्यांच्या संमिश्र स्वरूपाच्या कमेंट्स पाहायला मिळाल्या. या फोटोत दोघांच्याही जवळ पाण्याच्या बाटल्या होत्या. त्यामुळे ‘जगातले सर्वात महागडे वॉटर बॉय’ अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या. तसेच फोटोतील ऋषभ पंतलाउद्देशून ‘हा फोटो क्रॉप केला असता तर अजून चांगला दिसला असता’ अशा स्वरूपाच्या कमेंट्सद्वारे ट्रोल करण्यात येत आहे.