Home जागतिक आता आकाशातही पाहायला मिळणार जाहिरात….

आता आकाशातही पाहायला मिळणार जाहिरात….

0

प्राईम नेटवर्क : आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे. आज बाजारात आपला जम बसवण्यासाठी आणि आपल्या वस्तूंचा खप वाढवण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या जाहिराती करतात. वृत्तपत्रापासून ते टी. व्ही.,सिनेमा, होर्डिंग्ज, सोशल मिडिया अशा अनेक माध्यमातून जाहिराती पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल,हे सगळं आम्हाला माहिती आहे..इस में नया क्या है भाई ?

अहो, आता जाहिराती फक्त वृत्तपत्र,टी. व्ही, होर्डिंग्ज मध्येच पाहायला नाही मिळणार तर आकाशात पाहायला मिळणार आहेत. असं कुठं असतंय व्हय ? असतंय कि राव, रुसच्या एका स्टार्टअपने आकाशात जाहिरात करण्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे आता आकाशात बिलबोर्डस लावले जाणार आहेत.स्पेस बिलबोर्डस हे छोट्या छोट्या सॅटेलाईटच्या माध्यमातून तयार केले जातील. रॉकेटच्या मदतीने ते सॅटेलाईटप्रमाणे आकाशात सोडले जातील,त्यानंतर आकाशात याच दर्शन होणार आहे.

आता तुम्ही म्हणाल हे लोअर ओर्बिट वगैरे वगैरे काय असतं काय माहिती ? पण आकाशात जाहिरात दिसणार त्यामुळे आता व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाची जाहिरात करायला आम्ही मोकळे..थांबा थांबा जरा जमिनीवर या आणि पूर्ण बातमी तर वाचा…!

कंपनीच्या या योजनेवर जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला आहे की, यामुळे आकाशात सतेलाईट्स एकमेकांना धडकून ट्रॅफिक वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रोजेक्ट्समुळे आकाशात कचरा वाढेल. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या मते पृथ्वीच्या चारही बाजुंना जवळपास ५ लाख टन कचरा पसरला आहे.