Home आरोग्य पाकिस्तानचे विद्यार्थी चीनमध्ये म्हणताय, “मोदी है तो मुमकिन है, मोदी जिंदाबाद” :...

पाकिस्तानचे विद्यार्थी चीनमध्ये म्हणताय, “मोदी है तो मुमकिन है, मोदी जिंदाबाद” : गरज पडल्यास भारत करेल मदत!

0

महिन्याभरात कोरोना व्हायरस मुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला. चीनमधील कोरोना व्हायरसचे थैमान पाहता भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे आभार मानले आहेत. मात्र पाकिस्तानचे नागरिक अजूनही चीनमध्ये अडकले आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांना परत देशात आणण्यास नाकारल्याचे मिडीया रिपोर्ट नुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान “गरज पडल्यास किंवा पाकिस्तान सरकारला विनंती केल्यास चीनमधील पाकिस्तानी नागरिकांची सुखरूप सुटका करू” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना एका पत्रकाराने, “पाकिस्तानी विद्यार्थांची चीनमधून भारत सुटका करेल का?” असा प्रश्न विचारला. यावर रवीश कुमार म्हणाले,’ “पाकिस्तान सरकारने आम्हाला तशी विनंती केली नाही. मात्र, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास यावर आम्ही नक्की विचार करू.” पुढे एक पत्रकाराने “कोरोनामुळे चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी मोदी है तो मुमकिन है, मोदी जिंदाबादचे नारे देत आहेत,”असं रवीश यांना विचारलं असता त्यांनी यावर काहीही उत्तर न देता स्मित केलं व पुढे म्हणाले “चीन मधील पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले नॉर्मल व इ-व्हिसा अधिकृत आणि वैध नाहीत. जर एखाद्या चीनमधील व्यक्तीला भारतात यायचं असेल तर त्यांना भारताच्या दूतावासाशी संपर्क साधून व्हिसासाठी अर्ज करावा लागेल” असेही रवीश कुमार यांनी स्पष्ट केले.