Home जागतिक अफगाणिस्तानात प्रवासी विमान कोसळले : विमानात होते ८३ प्रवासी!

अफगाणिस्तानात प्रवासी विमान कोसळले : विमानात होते ८३ प्रवासी!

0

नुकताच मिळलेल्या माहिती नुसार अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये एक प्रवासी विमान कोसळून पडले आहे. लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार ‘वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे’ असे सांगितले जात आहे. हे विमान अफगाणिस्तानातील एरियाना या सरकारी कंपनीच्या मालकीचे होते, हा अपघात कसा व का झाला याबद्दल अद्याप कुठलीही सविस्तर माहिती मिळालेली नाही.

मीडिया रिपोर्ट नुसार गझीन प्रांतातील देह याक जिल्ह्यातील सादो खेल परिसरात दुपारी एक वाजून १० मिनिटांनी या विमानाचा अपघात झाला व हे कोसळून पडले. ‘गझनी प्रांताचे प्रवक्ते अरीफ नुरी यांनी दिलेल्या माहिती नुसार या विमानात ८३ प्रवासी प्रवास करीत असल्याचे ‘लोकसत्ता’ च्या रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे’. असही म्हटलं जातं आहे की हे विमान जिथे कोसळलं तो भाग तालिबाणांच्या ताब्यात आहे.