
संयुक्त राष्ट्र संघाच्या नवीन अवहालानुसार, कोरोना विषाणूमुळे लागलेला लॉकडाउन आणि त्यामुळे घरामध्ये बंदिस्त झालेले लोक यामुळे, भारत हा लोकसंख्या विस्फोटाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करत म्हटले आहे, ” कोरोना सोडा पण येत्या ९-१० महिन्यांमध्ये दवाखाने, रुग्णालये हे गरोदर महिला आणि नवजात बालकांनी भरून गेलेले असतील, परिस्तिथी एवढी हाताबाहेर गेलेली असेल की अनेक गरोदर स्त्रियांना दवाखाने उपलब्ध होणार नाहीत!”
” जगभरात लागलेल्या लॉक डाऊन मूळे जगभरात जवळ जवळ ११.५० कोटी नवीन बालके जन्मास येतील असा प्राथमिक अंदाज आहे, आणि ह्या नवजात बालकांना व त्यांच्या मातांना अतिशय हलाखीची परिस्तिथीचा सामना करावा लागेल.”, असे युनिसेफ चे म्हणणे आहे.
भारतामध्ये जवळजवळ २ कोटी बालकांचा जन्म येत्या ९ महिन्यात होणार आहे असे संयुक्त राष्ट्र संघाने सांगितले, ही नवजात बालकांची संख्या जगात पहिल्या क्रमांकावर असेल तर भारतापाठोपाठ चीन, नायजेरिया, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या राष्ट्रांचा क्रमांक लागतो.