Home जागतिक महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब : मराठमोळे हरीश साळवे होणार ब्रिटनच्या महाराणीचे वकील

महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब : मराठमोळे हरीश साळवे होणार ब्रिटनच्या महाराणीचे वकील

0

आंतरराष्ट्रीय कोर्टात आता भारतीय मराठमोळ्या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे. कारण ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची आता थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे आणि ही आपल्या भारतासाठी व महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब आहे. एक मराठमोळा माणूस ब्रिटन वर राज्य करणाऱ्या महाराणीसाठी वकील म्हणून काम करतात यावरुन मराठी माणसाच्या बुद्धीचा अंदाज साऱ्या जगाला येणार आहे. लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहणार आहेत. सध्या त्यांची फक्त निवड झाली असून येत्या १६ मार्चला त्यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार कोर्टात नुसतं एकदा हजर राहण्यासाठी हरिश साळवे ४ ते ५ लाख रुपये मानधन घेतात व संपूर्ण दिवस २५ ते ३० लाख रुपये! जे वकील कायदा व वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची व उत्तम कामगिरी बाजावतात त्यांनाच ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचा आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठा अनुभव, उत्तम कामगिरी आणि आमूलाग्र योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे अशी माहिती लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार मिळत आहे.