Home जागतिक ‘या’ दहा सेलिब्रेटींची नावं गुगलवर सर्च करणं तुम्हाला पडू शकतं महागात!

‘या’ दहा सेलिब्रेटींची नावं गुगलवर सर्च करणं तुम्हाला पडू शकतं महागात!

0

भारतीय खेळाडूंनी, कलाकारांनी, उद्योजक आणि नेतेमंडळींनी देश विदेशात आपली ख्याती पसरवली आहे. त्यातल्या त्यात तर सचिन तेंडुलकर, सनी लिओनी, महेंद्रसिंग धोनी, पी व्ही सिंधू ही नावं जप्रसिद्ध आहेत. परंतु या सेलिब्रेटींचं नाव गुगलसर्च करणं देखील तुम्हला खूप महागात पडू शकतं.

आजकाल आपण पूर्णपणे गुगलवर अबलंबून आहोत. कुठलीही माहिती हवी असेल तर आपण सर्वप्रथम गूगल करतो. मीडिया न्यूज नुसार गूगलच्या रिपोर्टप्रमाणे सनी लिओनी आणि महेंद्रसिंग धोनी ही नावे तर सर्च यादीत अग्रस्थानी आहेत. मॅकफे (McAfee) नामक कंपनीने केलेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार खालील १० नावे तुमच्या कम्प्युटरला किंवा फोनला नुकसान पोहोचवू शकतात.

१. महेंद्रसिंग धोनी

२. सचिन तेंडुलकर

३. गौतम गुलाटी

४. सनी लिओनी

५. बादशाह

६. राधिका आपटे

७. श्रध्दा कपूर

८. हरमनप्रीत कौर

९. पीव्ही सिंधू

१०. ख्रिस्तियानो रोनाल्डो

नक्की काय होतं ही नावे सर्च केल्याने?

“या सेलिब्रिटींचे नाव सर्च केल्यानंतर व्हायरस असलेली एक नवी वेबसाईट अचानक ओपन होते आणि या व्हायरसने तुमच्या कम्प्युटरला हानी पोहचू शकते.”