
चीन नंतर आता युरोप मध्ये कोरोना चा कहर पाहायला मिळतो आहे. परिस्थिती किती वाईट आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो की इटलीमध्ये या विषाणूने एकाच दिवसात 793 जणांचा मृत्यू झाला. यासह, आता इटलीमध्ये एकूण 4825 लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, हजारो जण या आजाराने ग्रसित आहेत आणि जगण्यासाठी लढा देत आहेत. दुसरीकडे, फ्रान्समध्ये आतापर्यंत 562 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये शनिवारी कोरोना विषाणूमुळे 793 जणांचा मृत्यू झाला असून एका दिवसात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यासह, देशातील या प्राणघातक विषाणूमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूची संख्या 4825 वर पोहचली आहे, जी जगभरात या आजाराने झालेल्या मृत्यूंपैकी 38.3 टक्के इतकी आहे. करोना विषाणूमुळे ग्रसित लोकांची संख्या वाढून 53578 झाली आहे, ही आणखी एक नोंद आहे. मिलानजवळील नॉर्थ लोम्बर्डीमध्ये मृतांचा आकडा 3 हजारांपेक्षा जास्त आहे. इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी हे दोन तृतीयांश आहे.
फ्रान्स मध्ये 24 तासांत 112 मृत्यू
फ्रान्समध्ये ही परिस्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे आणि गेल्या चोवीस तासांत कोरोना विषाणूमुळे ११२ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या मृत्यूंसह देशात मृतांची संख्या 562 वर पोहोचली असून या विषाणूमुळे 6172 लोक रुग्णालयात दाखल आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयात 1525 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यात म्हटले आहे की कोरोना विषाणू संपूर्ण प्रदेशात झपाट्याने पसरत आहे.