Home जागतिक ‘दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत’-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.

‘दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत’-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा येथे गुरुवारी (14 फेब्रुवारी) रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला होता. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. हल्ल्यानंतर भारत आणि पाकच्या संबंधांमधील तणावात आणखीच भर पडली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान गमावले आहेत आणि भारत पाकिस्तानच्या विरोधात खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो.पाकिस्तानला आमच्याकडून 1.3 अब्ज डॉलरची जी आर्थिक मदत दिली जयची, ती मदत आम्ही थांबवली आहे. असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधणं हे आव्हान आहे’ असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.