
जगाच्या पाठीवर कित्येक देशांमध्ये मासिक पाळीबाबत अजूनही हवी तितकी जागरूकता नाही. याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्कॉटलंड या देशाने एक महत्वाचा निर्णय घेतला. देशातील सर्व महिलांसाठी मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे असा ऐतिहासिक निर्णय घेणारा हा देश जगातील पहिला देश ठरला आहे.
न्यूज १८ लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार या मंगळवारी स्कॉटलंडच्या संसदेत पिरियड प्रॉडक्ट्स बिल नावाचे विधेयक मंजूर झाले व त्यामुळे या देशातील सर्व महिलांसाठी सॅनिटरी प्रॉडक्ट्स आता मोफत उपलब्ध झाले आहेत. स्कॉटलंड संसदेच्या सदस्य मोनिका लेनॉन यांनी हे विधेयक मांडले असून ‘स्कॉटलंड हा असे करणारा पहिला देश असला तरी शेवटचा नसायला हवा’ असे विधान त्यांनी केले.