Home जागतिक पुलवामामध्ये झाली जोरदार चकमक; तीन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा!

पुलवामामध्ये झाली जोरदार चकमक; तीन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा!

0

पुलवामामधील अवंतीपुरातील राजपुरा गावात जोरदार चकमक झाली असून या चकमकीदरम्यान भारतीय जवानांनी ३ दाहशवाद्यांना ठार केले. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवाडी संघटनेचे होते. “अवंतीपुरामध्ये दहशतवादी सक्रिय आहेत व त्यांनी एका घरामध्ये आश्रय घेतला आहे” अशी खात्रीशीर माहिती भारतीय जवानांना मिळाली होती व तीच हाताशी घेऊन आज दुपारी लष्कराने जोरदार शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान आजूबाजूच्या सर्व परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. परिणामी दहशदवाद्यांचा पळण्याचा प्लॅन सपशेल फसला आणि ते भारतीय लष्कराच्या जाळ्यात अडकले.

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सदर चकमकीचा खालील व्हिडिओ प्रसिद्ध केला असून तो पाहून सर्वस्त्र खळबळ उडाली आहे.

मीडिया न्यूज नुसार दहशतवादी एका घरात दबा धरून बसले होते. त्या ठिकाणाला राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी चारही बाजूंनी घेरताच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. मात्र त्यांना भारतीय जवानांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. तब्बल चार तास ही चकमक चालू होती. शेवटी तीनही दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं. घटनास्थळी झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटकं सापडली अशी माहिती मिळत आहे.