Home जागतिक मुंबईत कोरोनाचे दोन संशयित रुग्ण तर आता बिहारमध्ये देखील आढळला एक...

मुंबईत कोरोनाचे दोन संशयित रुग्ण तर आता बिहारमध्ये देखील आढळला एक संशयित रुग्ण ; देशात हाय अलर्ट जारी!

0

चीनमध्ये कोरोना व्हायरसने सुमारे ८० जनांचा बळी घेतला आहे. चीनमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दिशातून जन्य येणास बंदी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर हात मिळवण्यावर देखील बंदी लावण्यात आली आहे. हीच भीती आणि दहशत आता अनेक देशांत पसरत आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये या व्हायरसचे शिकार झालेले नागरिक आढळून आले आहेत. मुख्य म्हणजे यात आपल्या देशाचाही समावेश आहे. कारण मुंबईत कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर आता बिहार येथील छपरा भागात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. परिणामी भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सामनाच्या एका रिपोर्ट नुसार बिहारमधील एक तरुणी नुकतीच चीनहून परतली असून तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणे दिसत आहेत. प्रथम तिला छपरा येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार साठी दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या अधिक माहितीनुसार ‘कोरोना’ची लागण झाल्यास संशयितांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला, श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास अशी लक्षणे आढळतात. बिहारच्या चीनवरून परतलेल्या तरुणीला होणाऱ्या त्रासामध्ये आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साधर्म्य आढळल्यामुळे तिला लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खबरदारी म्हणून तिला आता पाटण्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे.