Home जागतिक युक्रेनचं विमान इराणमध्ये दुर्घटनाग्रस्त, १८० प्रवाशांचा मृत्यू!

युक्रेनचं विमान इराणमध्ये दुर्घटनाग्रस्त, १८० प्रवाशांचा मृत्यू!

0

इराणची राजधानी तेहरान येथे युक्रेनचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं ज्यात सुमारे १८० प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ या विमानाने बुधवारी सकाळी खोमेईनी विमानतळावरुन उड्डाण केलं. मात्र उड्डाण घेताच विमानात तांत्रिक अडचण आल्याने विमानाने पेट घेतला व विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जमिनीवर कोसळलं. या संदर्भात माहिती मिळताच तपास पथकाने घटनास्थळ गाठलं. या विमानाला आग लागली होती. शर्थीचे प्रयत्न करून इराणच्या नागरी विमान वाहतूक विभागाने काही प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात कितपत यश आलं याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

एकीकडे हा विमान अपघात तर दुसरीकडे इराणकडून अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तासानंतरच विमान दुर्घटना झाली अशी माहिती मिळत आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेच्या सुमारे ३० सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराण करीत आहे. तर विमान अपघातात सुमारे १८० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार मिळत आहे.