
सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रजेवर होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती शोमध्ये परत कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याबाबत टेलिव्हिजन क्षेत्रात चर्चा सुरू आहे. त्यानुसार दयाबेन नवरात्रीच्या एपिसोड्स मधून कमबॅक करणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या शो चे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. एका युट्युब चॅनेलशी बोलतांना सांगितले की दयाबेनच्या कमबॅकची अजूनही निश्चितता नाही. तसेच असित कुमार मोदी दयाबेनला शोमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याबद्दल तिच्या कुटूंबियांशी व तिच्याशी चर्चा सुरू आहे असेही निर्मात्यांनी सांगितले.