Home मनोरंजन प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलला पाळणा. शेअर केला बाळासोबतचा फोटो!

प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलला पाळणा. शेअर केला बाळासोबतचा फोटो!

0

प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेने एक गुड न्यूज सगळ्यांसोबत शेअर केली आहे. ८ ऑगस्ट ला प्रियंका आणि सारंगने बाळासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बाळाचं नाव प्रियंकाने युवान ठेवले आहे. त्यासाठी तिला आणि सारंग ला अनेक चाहत्यांनी तसेच सेलिब्रेटींनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय आहे.

फोटोमध्ये प्रियंकाच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद स्पष्ट दिसतो आहे. पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट प्रियंका आणि सारंग मोठ्या आतुरतेने पहात होते. प्रियंका आणि सारंग दोघंही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवतात तसेच त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे.

प्रियांका ने मराठी तसेच बॉलीवूड मधे देखील पार्श्वगायन केले आहे. ‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ याच्या पार्श्वगायनासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला.’आनंदी गोपाळ’, ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केलं आहे.