Home मनोरंजन या गायकाबरोबर नेहा कक्कर लवकरच विवाहबंधनात अडकणार; दोघांच्या गाण्याच्या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद

या गायकाबरोबर नेहा कक्कर लवकरच विवाहबंधनात अडकणार; दोघांच्या गाण्याच्या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद

0

सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका व सेलिब्रिटी नेहा कक्करच्या लग्नाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. इंडियन आयडॉल शो मुळे आदित्य नारायण आणि नेहा लग्न करणार असल्याच्या बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. मात्र नेहाने आता एक वेगळी बातमी दिली असून ती रोहनप्रीत सिंग या गायकासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांचा ‘नेहू दा व्याह’ या गाण्याचा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय होत आहे. या गाण्यातही ती रोहनप्रीत सिंगच्या पत्नीच्या रूपात दिसली.

काही दिवसांपासून नेहा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोहनप्रीत सिंग सोबतचे फोटोज शेअर करत आहे. त्यावरून ते दोघे प्रेमात असल्याचे चाहत्यांना कळले. तसेच ते लवकरच लग्न करणार असल्याचेही मीडिया न्यूजमध्ये सांगितले जात आहे. या बातमीमुळे नेहाचे चाहते खुश आहेत व नेहू दा व्याह या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. या गाण्याच्या रिलीजनंतर #nehudavyah #nehupreet हे हॅशटॅग चांगलेच ट्रेंड होत आहेत.