Home अर्थजगत सोने चांदीच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या नवीन दर.

सोने चांदीच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या नवीन दर.

0

जवळपास ५ महिन्यांपासून चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यातच भारतात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचे समजते. आज १२ ऑगस्टला सोन्याचे दर ४ हजार रुपयांनी कमी होऊन थेट ५१,७०० रुपयांवर येऊन पोहचले आहेत. तसेच चांदीचे दर देखील १२०० रुपयांनी घसरले आहेत.

लोकमतच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याने सोने व चांदीचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र रशियाने कोरोना लशीची घोषणा केल्यामुळे या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो ६३ हजार ५०० रुपये व सोन्याचा भाव प्रति तोळा ५१ हजार ७०० रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात देखील सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. तसेच आणखी काही दिवस या दरात घसरण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.