Home महाराष्ट्र १५ जुलै ला बारावीचा निकाल लागणार : वर्षा गायकवाड

१५ जुलै ला बारावीचा निकाल लागणार : वर्षा गायकवाड

0

लॉकडाउनमुळे चिंतेत असणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याकडून दिलासा मिळाला आहे. १५ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासोबतच जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर करणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न असणार असल्याची माहितीही यावेळी दिली आहे.

यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनीही निकालाबाबत माहिती दिली होती. शकुंतला काळे म्हणाल्या, ‘दहावी- बारावीच्या निकालाचं काम अजून चालू आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी अजून सुरु आहे. उत्तरपत्रिका संकलन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका संकलनाची कामंही थांबली होती. हे काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे आत्ता लगेच निकालाची तारीख सांगता येणार नाही

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.