Home महाराष्ट्र पुणे रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनाग्रस्त पत्रकाराचा मृत्यू; नितेश राणे म्हणतात ‘खून झाला’

रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनाग्रस्त पत्रकाराचा मृत्यू; नितेश राणे म्हणतात ‘खून झाला’

0

TV9 मराठी वृत्तसंस्थेचे पुणे शहर प्रतिनिधी ४२ वर्षीय पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळू शकला नाही व त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २० ऑगस्टपासून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. सुरुवातीला त्यांना थंडी तापेचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचे सांगितले मात्र २७ ऑगस्टला त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. म्हणून ते त्यांच्या गावी कोपरगावला गेले.

मात्र गावी गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला व त्यांची कोरोना चाचणी पोझिटीव्ह आली. त्यामुळे त्यांना ३० ऑगस्टला पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावली व त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. त्यासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी व्हेंटिलेटर असणारी रुग्णवाहिका आवश्यक होती. परंतु त्यांची ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावत चालली होती पण रुग्णवाहिका मिळत नव्हती. त्यामुळे वेळेत उपचार न मिळू शकल्याने सकाळी ५ वाजेपर्यंत त्यांचे प्राण गेले असे लोकमतच्या मीडिया न्यूजमधून समजले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून या प्रकरणावर आपले मत मांडून राज्य सरकारवर निशाणा साधला.