Home महाराष्ट्र धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक; पुन्हा आंदोलनाला सुरुवात

धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक; पुन्हा आंदोलनाला सुरुवात

0

गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाज ST आरक्षणासाठी लढत आहे. या समाजाने आजवर कित्येक वेळा आंदोलन केले मात्र त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. याच पार्श्वभूमीवर धनगर समाज संघर्ष समितीने आक्रमक होऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात काल या आंदोलनाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पत्र पाठवले गेले.

या निवेदनात अनेक मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या. ‘धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, आदिवासी समाजाच्या २२ योजना धनगर समाजासाठी लागू करण्यात याव्या, मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न सोडवावा, धनगरांसाठी अर्थसंकल्पात मांडलेल्या १ हजार कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करावी, धनगरांसाठीही सारथीसारखी वेगळी संस्था स्थापण करावी’ या व इतर काही मागण्या असलेले निवेदनपत्र जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवले गेले. हे निवेदन मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर समाजाने दिला.