Home महाराष्ट्र दहावी व बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या पुनर्परिक्षेच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिला महत्वाचा निर्णय

दहावी व बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या पुनर्परिक्षेच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिला महत्वाचा निर्णय

0

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल लागल्यापासून नापास विद्यार्थ्यांची पुनर्परिक्षा कधी घेतली जाईल हा मोठा प्रश्न होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या शाळा कॉलेजेस बंद असल्याने सरकारलाही याबाबत निर्णय घेता येत नव्हता. हा निर्णय अखेर झाला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबद्दलची माहिती दिली.

या निर्णयानुसार दहावी व बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे. वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली असून त्या म्हणाल्या की दहावीत एकूण २५ हजार व बारावीत १ लाख ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत तसेच एटिकेटी असलेले देखील बरेच विद्यार्थी आहेत. तसेच ‘दहावीत एटीकेटी असणाऱ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची परवानगी आहे तरीही एक संधी म्हणून ते फेरपरिक्षा देऊ शकतात’ असेही त्या म्हणाल्या.