Home महाराष्ट्र ठाकरे सरकार एनसीबीच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप

ठाकरे सरकार एनसीबीच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगळीच वळणे घेत आहे. या मुद्द्यावरून अनेक राजकीय गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणाची चौकशी करीत असून ड्रग्स संबंधात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. यातील काहींना एनसीबीने नोटीसही पाठवली आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर मोठा आरोप केला आहे.

एका मुलाखतीत बोलतांना नवनीत राणा म्हणाल्या की ठाकरे सरकार एनसीबीच्या चौकशीत हस्तक्षेप करीत आहे. तसेच ‘राज्यातील महत्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित व्हावे म्हणून या इतर प्रकरणांकडे सरकार जनतेचं लक्ष वळवण्याचं काम करतंय’ असेही त्या पुढे म्हणाल्या.