Home आरोग्य राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत राहणार : उद्धव ठाकरे

राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत राहणार : उद्धव ठाकरे

0

सद्यस्थितीत राज्यातील लॉकडाऊन हे ३० जूनपर्यंत आहे परंतु यानंतर काय असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला होता, राज्यातील दळणवळण सुविधा पूर्वरत झालेल्या नाहीत, मुंबईसारख्या ठिकाणी लोकल सुविधा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी आहेत. या सर्व प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे राज्यातील सद्यस्तिथीला असलेले लॉकडाऊन हे ३१ जुलै पर्यंत तसेच राहणार आहे.जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. ३० जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगताना, जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत, ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जातात .प्लाझ्मा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च-एप्रिलपासून झाली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले, तर ७ जण घरीही गेले. प्लाझ्मा थेरपी करणारे देशातील सर्वांत मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, अँटिबॉडीज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा,” असे आवाहन त्यांनी केले.