Home महाराष्ट्र मुंबई रेल्वेचा सावळा गोंधळ! मुंबईमधील रेल्वे स्टेशनवर २५००० लोकांची गर्दी

रेल्वेचा सावळा गोंधळ! मुंबईमधील रेल्वे स्टेशनवर २५००० लोकांची गर्दी

0

गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे शाब्दिक युद्ध सुरू आहे. या गोंधळामुळे मात्र परराज्यात जाणाऱ्या मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. सोशल डिस्टन्सचे पालन होण्याऐवजी रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी पाहायला मिळाली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर १० हजार लोक तर लोकमान्य टिळक टर्मिनल्स ला १५ हजार लोक काल मध्यरात्री च्या सुमारास जमा झाले होते.

दोन्ही स्थानकांवर एवढा मोठा जमाव जमल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. एकतर जमलेले मजूर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहीही करून आम्हाला आता मुंबईत रहायचं नाही, आम्हाला आमच्या गावी जायचं आहे, असं त्या मजुरांचं म्हणणं होतं. सीएसएमटी स्टेशनची क्षमता 23 रेल्वे गाड्यांची असताना रेल्वेने 46 गाड्यांचं वेळापत्रक एका दिवशी लावलं आहे.

दरम्यान रेल्वेच्या उपलब्धतेवरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राकडे याद्या मागत बसू नये असं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडलात आणि राज्य म्हणून पाहिलं तर याद्या मागण्याचा प्रश्न येणार नाही,” असंही संजय राऊत म्हणाले.परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे.