Home महाराष्ट्र मुंबई भाजप नेते किरीट सोमैय्या यांना पोलिसांनी अटक केले; काय आहे अटकेचे कारण?

भाजप नेते किरीट सोमैय्या यांना पोलिसांनी अटक केले; काय आहे अटकेचे कारण?

0

नुकत्याच आलेल्या मीडिया न्यूजनुसार भाजप नेते किरीट सोमैय्या यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. किरीट सोमैय्या घाटकोपर मध्ये करत असलेले आंदोलन पोलिसांनी थांबवायला सांगितले. मात्र किरीट सोमैय्या यांनी नकार दिला व पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केले व घाटकोपर स्टेशनला आणले.

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे शीतल दामा या महिलेचा गटारात पडून मृत्यू झाला. तरीही याबद्दल एफआयआर दाखल केली गेली नाही. म्हणून या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी किरीट सोमैय्या आंदोलन करत होते. आज अर्थात १५ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता घाटकोपर येथील चिराग नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर किरीट सोमैय्या मृत महिलेच्या कुटुंबियांसोबत धरणा आंदोलन पुकारले. याबद्दलची पूर्वसूचना त्यांनी ट्विटमार्फत दिली होती.

हे आंदोलन थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी किरीट सोमैय्या यांना सांगितले. मात्र त्यांनी आंदोलन थांबवण्यास नकार दिल्याने त्यांच्यात व पोलिसांत बाचाबाची झाली आणि पोलिसांनी किरीट सोमैयांना अटकेत घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल केले.