Home महाराष्ट्र मुंबई जर निसर्ग चक्रीवादळ १५८ किमी प्रति तास वेगाने धावले तर मुंबई होईल...

जर निसर्ग चक्रीवादळ १५८ किमी प्रति तास वेगाने धावले तर मुंबई होईल नेस्तनाबूत!

0

मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ आलेले असून ते पुढच्या काही तासात मुंबईला धडकणार आहे. हे वादळ ताशी १२० किमी वेगाने प्रवास करत असून जर हा वेग वाढला आणि १५८.१ किमी प्रति तास झाला तर मुंबई नेस्तनाबूत होऊ शकते, याचे कारण म्हणजे मुंबईमधील इमारती ह्या १५८ किमी प्रति तास इतक्या वेगा साठी बांधल्या गेल्या असून त्या वरती जर हा वेग गेला तर ह्या गगनचुंबी इमारती क्षणार्धात जमीनदोस्त होतील.

नुकतेच अम्फान हे महाभयंकर चक्रीवादळ येऊन गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत तसेच आर्थिक हानी झाली. भारतीय किनारपट्टीवर येणारी जास्तीत जास्त वादळे ही बंगालच्या उपसागरात निर्माण होत असतात. तुलनेत अरबी समुद्रात अशी निर्माण होणारी चक्री वादळे कमी असतात. जरी काही वादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली तरीही त्याचा केंद्रबिंदू मुंबईच्या आसपास असणे ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु यावेळी जून महिन्यात एक वादळ निर्माण झाले आहे. असे वादळ गेल्या १०० वर्षात पहिल्यांदाच निर्माण झाले आहे.

इतर वेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले की वादळ येण्याची शक्यता वाढते. पण अरबी समुद्राबाबत असे सहसा होत नाही. जरी तसे झाले तरी निर्माण झालेले वादळ अनेक वेळा येमेनच्या दिशेने सरकते. यावेळी मात्र हे वादळ थेट कोकण किनारपट्टीला धडकणार आहे. यात विशेष बाबा ही आहे की ज्या भागात हे वादळ धडकू शकते त्या भागात लोकसंख्येची घनता अधिक आहे. रायगड ते दमण या किनारपट्टीच्या भागात हे वादळ धडकणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.

जून ते सप्टेंबर या दरम्यान अनेकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असतात. त्यातील ठराविक कमी दाब प्रणालीचे रूपांतर वादळात होते. बहुतांशी वादळे बंगालच्या उपसागरात निर्माण होतात. त्यांचा प्रभाव सुद्धा जास्त असतो.