Home महाराष्ट्र नागपूर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

0

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात अनेक मोठमोठ्या नेत्यांना तसेच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा ७ लाखांच्या जवळ जाऊन पोहचला आहे. नागपुरात देखील कोरोनाबधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यातच आता नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले आहे. त्यांना सध्या कोणतीही लक्षणे नसली तरीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मुंढे यांनी स्वतः याबद्दल ट्विट करून माहिती दिली.

या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली आहे. मला कुठलीही लक्षणे नसून मी स्वतःला नियमांनुसार आयसोलेट केलं आहे.” तसेच मागील १४ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले व नागपूरमधील महामारीची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते घरून काम करीत आहेत असेही ते ट्विटमध्ये म्हणाले.

मीडिया न्युजनुसार मुंढेंकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीची चाचणी गेल्या रविवारी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे मुंढेंसहित त्यांच्या संपूर्ण स्टाफची चाचणी करण्यात आली व त्यात मुंढे आणि एका पोलीस अधिकाऱ्याची चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याचे समजले.