Home महाराष्ट्र दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याला राणे बंधूंचे ट्विटद्वारे सडेतोड उत्तर

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याला राणे बंधूंचे ट्विटद्वारे सडेतोड उत्तर

0

काल २५ ऑक्टोबर २०२० ला संपूर्ण भारतभर दसरा उत्सव साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षीही थाटात पार पडला. या मेळाव्यात भाषण करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रांना उद्देशून ‘एक बेडूक आणि त्याची दोन पिल्ले’ असे विधान केले. हे त्यांचे विधान बरेच चर्चेत आले असून आमदार नितेश राणे व निलेश राणे दोघांनीही ठाकरेंच्या त्या विधानाला ट्विट करून सडेतोड उत्तर दिले.

शिवसेना दसरा मेळावा व्हिडीओ

या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, “एक बेडूक आणि त्याची दोन पिल्ले आपल्याला माहितीच आहेत, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या पिल्लांनी वाघ पाहिला आणि त्यांच्या बाबांना वाघासारखा आवाज काढा म्हणाले. हा बाबा आवाज काढतो पण तो चिरक येतो.” यावर नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, “दुसऱ्यांची पिल्ले वाईट तर मग यांनी काय मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातलाय का?”

तर निलेश राणेंनी देखील ठाकरेंना अगदी मोजक्या शब्दांत पण सडेतोड उत्तर दिले. तसेच ‘दसरा मेळाव्याच्या भाषणात मराठा व धनगर आरक्षणावर १ वाक्य तर बिहारवर २० मिनिटं बोलून नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी फालतू व पोकळ भाषण केले’ असेही निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले.

तसेच भाजपच्या बिहारला कोरोना वॅक्सीन फ्री देण्याच्या आवाहनावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्याला उद्देशून नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, “यांनी बिहारच्या आधीच वॅक्सीन घेतलेली दिसते.”