Home महाराष्ट्र बलात्कार करणाऱ्यावर कोरोना चे उपचार नकोत, कोरोना मधून वाचला तर भर चौकात...

बलात्कार करणाऱ्यावर कोरोना चे उपचार नकोत, कोरोना मधून वाचला तर भर चौकात फाशी द्या: मनसे

0

पनवेल येथे विलगिकरण कक्षात(Quarrentine Centre) मध्ये असलेल्या एका महिलेवर मी डॉक्टर आहे असे म्हणत बलात्कार केला, यानंतर महाराष्ट्रातले वातावरण अतिशय तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आक्रमक झाली आहे.

“बलात्कार करणाऱ्याला कोरोनावर उपचार नकोत, त्यातून जर तो वाचला तर त्याला भर चौकात फाशी द्या”, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे, ” पनवेल मध्ये क्वारंटाइन सेंटर मध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचे ऐकून हे सिद्ध होते की महिला या कुठेच सुरक्षित नाहीत, या बलात्कारी माणसाला कोरोनाचा कुठलाज इलाज न करता शिक्षा करावी यातून तो मेला तर ठीक नाहीतर त्याला भर चौकात फाशी द्यावी” असे त्या म्हणाल्या.

पनवेल सारखाच एक प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील मध्ये सुद्धा झाला असून बलात्कार करणाऱ्या पुरुषाला न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्याला कोठडीत रवाना केल्यावर जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा कळले की हा गुन्हेगार कोरोना पॉसिटीव्ह आहे, त्याने बलात्कार केलेली स्त्री सुद्धा कोरोना पॉसिटीव्ह आली असून न्यायालय आणि पोलीस स्टेशन मधील सर्व लोकांना आयसोलेशन मध्ये टाकण्याची वेळ आली आहे.