Home महाराष्ट्र पुणे मुंबई पुण्यात अडकलेल्यांंनी घरी जाण्यासाठी काय करावे, वाचा सविस्तर बातमी

मुंबई पुण्यात अडकलेल्यांंनी घरी जाण्यासाठी काय करावे, वाचा सविस्तर बातमी

0

जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातली लॉकडाऊनची मुदत 3 मेला संपणार होती. मात्र ती पुन्हा 17 मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन म्हणून वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला ४ मे पासून सुरूवात होणार आहे. ४ मे ते १७ मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत तसंच राज्यातल्या अनेक भागात लोक अडकून पडले आहेत. आता मुंबईत अडकून पडलेल्या लोकांसाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

पर्यटक, तिर्थयात्री, विद्यार्थी आणि कामगार यांना आता आपापल्या राज्यात किंंवा त्यांच्या मूळगावी जाता येणार आहे.

मुंबईत ९० पेक्षा जास्त पोलिस स्टेशन आहेत.त्यातल्या कोणत्याही एका पोलिस स्टेशनला जाऊन तुम्हाला तिथे एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्या अर्जात तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पत्ता भरून द्यावा लागणार आहे.

तसंच तुम्ही कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात? किती आसन क्षमता असलेलं ते वाहन आहे? आणि किती लोक त्या वाहनातून सद्य परिस्थितीत प्रवास करणार आहात? याचे डिटेल्स देखील देणं गरजेचं आहे. नागरिकांना पोलीस स्टेशन्स मध्ये गर्दी न करता पोलिसांना सहकार्य करत सदर प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यातल्या विविध भागात अडकलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक SOP पाठवला आहे त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्याची नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.