Home राष्ट्रीय आठवले म्हणतात चायनीज खाणं सोडून द्या, चीन आपला दुष्मन!

आठवले म्हणतात चायनीज खाणं सोडून द्या, चीन आपला दुष्मन!

0

चीन देशाच्या राजदूतांसोबत गो कोरोना गो चे नारे लगावणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज अजब मागणी केली आहे, देशातील सर्व लोकांनी चायनीज खाणं सोडून द्यायला हवे कारण चीन हा दुष्मन देश आहे असे आठवले म्हणतात.

सोमवारी लडाख मधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहिद झाले आणि देशभर चिनविरोधी संतापाची लाट उसळली. सगळीकडे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली इतकेच नाही तर घरातील चिन मध्ये बनवलेला TV सुद्धा फोडण्याचे प्रकार झाल्याचे समोर येत आहे.

अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या दाव्यानुसार चीन सैन्यातील ४० लोक ठार झाले असून या वाढत्या तणावामुळे दोन्ही बाजूच्या राष्ट्रांची सीमेजवळ हालचाल वेगाने सुरू आहे. भारताने सीमेजवळील सर्व गावे रिकामी केली असून तिथे आता हेलिकॉप्टर आणि फायटर जेट आणण्यास सुरवात झाली आहे असे वृत्त पुढे येत आहे.

या युद्धजन्य परिस्थितीचा अनेक देश जागतिक महायुद्धास सुरवात असे वर्णन करत असून, अमेरिकेने इंडो पॅसिफिक महासागरात लढाऊ विमाने सज्ज असलेली नौवाहक जहाजे तैनात केली आहेत तर तायवान सारखे देश भारताच्या बाजूने उभे आहोत असे त्यांच्या वृत्तपत्रातून सांगत आहेत.

चीन विरोधी भूमिका हळूहळू पसरत आहे त्याचाच एक भाग म्हणून BSNL आणि MTNL सारख्या कंपन्या चिनी वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणार असल्याचे सांगत आहेत.