Home राष्ट्रीय दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील संपत्तीचा केंद्र सरकारकडून लिलाव!

दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील संपत्तीचा केंद्र सरकारकडून लिलाव!

0

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. प्रभात वृत्तसंस्थेच्या मीडिया न्यूजनुसार येत्या १० नोव्हेंबरला दाऊदच्या महाराष्ट्रात असलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स या संस्थेअंतर्गत हा लिलाव होणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंगसाठी हा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर केला जाणार आहे. याआधीही त्याच्या मुंबईतील अनेक मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दाऊदच्या एकूण ७ मालमत्तांपैकी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मुंबाके येथे दाऊदच्या ६ मालमत्ता आहेत. रत्नागिरीतील या सर्व मालमत्तांचा लिलाव १० नोव्हेंबरला होणार असून हा आजवरचा सर्वात मोठा लिलाव असणार असल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. यात १८ गुंठ्यांपासून ३० गुंठ्यांपर्यंतच्या जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची राखीव किंमत दीड लाखांपासून ६ लाखांपर्यंत आहे. या लिलावात मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याची चिन्ह आहेत.