Home आरोग्य राज्यातील प्रत्येक नागरिकाचा ‘या’ योजनेअंतर्गत करोनाचा उपचार होईल कमी खर्चात

राज्यातील प्रत्येक नागरिकाचा ‘या’ योजनेअंतर्गत करोनाचा उपचार होईल कमी खर्चात

0

नाशिक मध्ये दिवसेंदिवस कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी या संकटाला तोंड देत असतांना रुग्णावर होणारा खर्च सगळेच भरू शकतात असे नाही, आता हा खर्च कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जनजागृती करत आहे. या योजने अंतर्गत कमी खर्चात तुमचा कोरोनाचा ईलाज होऊ शकतो. म्हणूनच या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

केवळ नाशिकच नाही तर इतरही जिल्ह्यातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यासाठी नाशिकमध्ये दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करोना आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा उपचार देखील कमी खर्चात या योजनेअंतर्गत होणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. सर्वप्रथम नागरिकांनी आपल्याला या योजनेची गरज पडणारच नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, करोनाची बाधा झाल्यास वेळीच रुग्णालयात पोहचून उपचार सुरू करावेत. लोकमतच्या रिपोर्ट नुसार “आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवून रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रक्रिया करण्यास सांगावे तसेच याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.” त्याचा देखील नागरिकांनी वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. त्याच बरोबर नाशिकच्या नागरिकांना या योजनेबाबत काही अडचणी असल्यास दाभाडे यांच्याशी ९४०४५ ९४१६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही मांढरे यांनी आवाहन केले आहे.