Home राष्ट्रीय भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोरोना पॉसिटीव्ह!

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोरोना पॉसिटीव्ह!

0

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा २३ लाखांच्या घरात पोहचला असून अनेक मोठमोठे नेते देखील कोरोनाच्या तावडीत सापडत आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. याबाबतची माहिती प्रणब मुखर्जी यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरून दिली. मीडिया रिपोर्टनुसार प्रणब मुखर्जी अनेक कारणास्तव दवाखान्यात गेले होते. तेव्हा त्यांची केलेली कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली आहे. प्रणब मुखर्जींचे वय ८४ वर्ष असल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

आपल्या ट्विटमधून त्यांनी मागील ८ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना टेस्ट करण्याचे व स्वतः विलगिकरण पाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय भारताचे गृहमंत्री अमित शाह हेदेखील कोरोना पोसिटीव्ह असून सध्या मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत.