Home राष्ट्रीय कोरोना काळात रेल्वेत नोकरीचा महापूर, तब्बल १.४ लाख जागांची भरती, वाचा सविस्तर

कोरोना काळात रेल्वेत नोकरीचा महापूर, तब्बल १.४ लाख जागांची भरती, वाचा सविस्तर

0

एकीकडे कोरोनामुळे संबंध अर्थव्यवस्था डबघाईला लागलेली असून सर्वांना बेरोजगारीची भीती आहे पण आता एक आनंदाची बातमी समोर येते आहे. भारतीय रेल्वे ने तब्बल १.४ लाख जागांसाठी भरती घेणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर जागा ह्या भारतीय रेल्वे मध्ये सेफ्टी आणि नॉन सेफटी या दोन भागांमध्ये असणार आहे.

रेल्वेने आपल्या वेबसाईटवर याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध केली असून, आपल्याला या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. रेल्वेत नोकरीसाठी सेफ्टी कॅटेगरीमध्ये 72274 पदांसाठी आणि नॉन सेफ्टी कॅटेगरीमध्ये 68366 पदांसाठी भरती असल्याची माहिती आहे.

याआधी रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) ईस्टर्न रेल्वेमध्ये एक्ट अप्रेंटिससाठी ( Act Apprentice) भरती सुरु केली होती.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इयत्ता 10वीमध्ये कमीत कमी 50 टक्के मार्क असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे एनसीवीटी, एससीवीटीकडून नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाईनमॅन, वायरमॅन, कारपेंटर, पेंटर या पदांसाठी 8वी उत्तीर्णसह नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी 15 ते अधिकाधिक 24 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. वयोमर्यादेमध्ये एससी, एसटीसाठी 5 वर्ष, ओबीटी-एनसीएल उमेदवारासाठी 3 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारासाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

खालील संकेतस्थळ भेट देऊन आपण सदर बाबतीत अर्ज आणि अधिक माहिती बघू शकता

http://apprentice.rrcrecruit.co.in/gen_instructions_er.aspx
http://www.rrcer.com