Home राष्ट्रीय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनू सूद देणार स्कॉलरशिप; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनू सूद देणार स्कॉलरशिप; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

0

लॉकडाऊनच्या काळात समाजातील अनेक स्तरांवरील लोकांना आर्थिक तसेच इतरही मदत करणाऱ्या सोनू सूदने आता आणखी एक नवी योजना आणली आहे. परगावी अडकलेल्या मजुरांना घरी पोहचवणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, गरीब मुलांना शिक्षणासाठी सामग्री उपलब्ध करून देणे या सर्व मोठमोठ्या कामगिर्यांनांतर सोनू सूदने आता उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार असल्याचे सांगितले आहे.

सोनू सूद त्याच्या आईच्या नावे ही स्कॉलरशिप सुरू करत आहे. याबद्दलची माहिती त्याने ट्विट करून दिली. या ट्विटमध्ये त्याने सांगितले की शाळेनंतरच्या पुढील शिक्षणासाठी तो स्कॉलरशिप देणार आहे. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी scholarships@sonusood.me यावर ई-मेल करावा असेही त्याने ट्विटमधून सांगितले.

तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने सांगितले की पुढील १० दिवसात दिलेल्या मेल आयडीवर अर्ज करावा.