Home जागतिक भारत-चीन वादाचे पडसाद रामजन्मभूमीवर सुद्धा, मंदिराचे बांधकाम थांबवले

भारत-चीन वादाचे पडसाद रामजन्मभूमीवर सुद्धा, मंदिराचे बांधकाम थांबवले

0

भारत-चीन संबंध चिघळला असून सीमाभागात प्रचंड तणाव वाढलेला आहे, अशातच राम मंदिर बांधकाम संबंधी ट्रस्ट ने राम मंदिराचे बांधकाम थांबवले असून त्यांच्या म्हणण्यानुसार राम मंदिरापेक्षाही देशाची रक्षा जास्त महत्वाची आहे.

बांधकाम थांबवण्याचा निर्णय हा भारत चीन सीमेवरील २० जवान शहीद झाल्यानंतर घेण्यात आला. या शहिद झालेल्या शिपायांच्या वृत्तानंतर ट्रस्ट ने बांधकाम थांबवत लवकरचं नवीन तारीख जाहीर करू असे सांगितले आहे.

दरम्यान अयोध्येत शहीद शिपायांना आदरांजली देण्यात आली असून, चिनविरोधी निदर्शने जोर धरत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. हिंदू महासभेने चीनचे राष्ट्रध्वज जाळण्याचा कार्यक्रम नियोजित केला आहे तर विश्व हिंदू परिषद चीन मधील वस्तूंची होळी करणार असल्याचे समजते.

राममंदिर बांधकाम ट्रस्ट चे अनिल मिश्रा यांनी PTI या वृत्तसंस्थेला सांगितले की, ” मंदिर बांधकाम सुरू करण्याचा निर्णय हा देशातील परिस्तिथी बघून घेण्यात येईल आणि आम्ही रीतसर त्यासंबंधी घोषणा करू”.